ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
नेवासा तालुका एकता पत्रकार संघ

नेवासा – नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलात पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

मुकिंदपूर येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या शुभहस्ते व आमदार विठ्ठलराव लंघे, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहेबराव घाडगेपाटील यांना शिक्षणमहर्षी तर ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे, कारभारी गरड व बन्सी एडके यांना दर्पण पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!