सोनई | संदीप दरंदले – नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या आधारवड व संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर यांच्या मातोश्री सुलोचनाताई (बाई) बेल्हेकर यांचे वयाच्या ७६ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. नेवासा तालुक्यातील सोनई येथील प्रगतशिल शेतकरी पाटीलबा बेल्हेकर व सुलोचना बेल्हेकर(बाई) यांनी अतिशय प्रेमळ स्वभाव,कष्टातून व सामान्य परिस्थितीत आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले.

तीन मुले व एक मुलगी, सुना,नातवंडे असा खूप मोठा परिवार असून मोठा मुलगा अशोकराव बेल्हेकर व रमेशराव बेल्हेकर प्रगतशील शेतकरी असून सुरेशराव डॉक्टर आहेत. मुलगी सौ. संजीवनी नानासाहेब खर्डे डॉ.सुरेशराव बेल्हेकर व रंजनाताई बेल्हेकर यांनी सोनई या ठिकाणी हॉस्पिटल तसेच भानसहीवरे येथील खडकाळ माळरानावर सन २००६ मध्ये मातोश्री च्या नावाने सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था उभी केली आहे. संस्थेमध्ये विविध प्रकारचे कॉलेज, शाळा, कृषि कॉलेज, वैद्यकीय कॉलेज, पॉलिटेकनिक , फार्मसी कॉलेज ची निर्मिती केली. आज सुलोचना(बाई) बेल्हेकर यांच्या आशीर्वादाने हजारो विद्यार्थी संस्थेमध्ये शिकत असून बरेच विद्यार्थी परदेशात व राज्यात नोकरी करत आहेत.

बाईंच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन एक संस्थेचा आधारवड, आई हरपली, खूप जड अंःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला.यावेळी पंचगंगा समूहाचे अध्यक्ष प्रभाकर (काका)शिंदे, मुळा समूहाचे विश्वासमामा गडाख, पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार,ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याचेसंचालक शिवाजी दादा भुसारी, शिवाजी बनकर, जिल्हा बँकेचे संचालक रावसाहेब शेळके, मुळा कारखान्यांचे चेअरमन नानासाहेब तुवर, प्रताप शेळके, जनभाऊ पटारे, देविदास साळुंके, बाबासाहेब शिरसाठ,मा.सरपंच अशोक शेट बोरा, भाऊसाहेब पाटील निमसे,सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील भणगे, भाऊसाहेब पाटील लांडे, धनेश मुनोत,डॉ.विकास दहातोंडे, भाऊसाहेब पाटील अंबाडे, कल्याणराव पाटील, नेवासा तालुका व पंचक्रोशीतील सर्व मान्यवर,सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्थेचे संचालक, सर्व प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.