सोनई | संदीप दरंदले – वारकरी संप्रदायाचे अभ्यासक चिंचोडी पाटील येथील ह.भ.प. श्री.अशोकानंद महाराज कर्डीले यांचे निधन झाले.आज दुपारी चिचोंडी पाटील येथील आश्रमात होणार अंत्यसंस्कार होणार आहेत.कर्डीले जलसंपदा विभागातून सेवानिवृत झाले होते. संतसाहित्याचा त्यांचा मोठा अभ्यास होता. चिंचोडी पाटील येथे त्यांनी गुरुकुल भागवताआश्रम स्थापन केला. कीर्तन, प्रवचन, लेखन या माध्यमातून ते प्रबोधन करीत.

अलीकडे ते आजारी होते. दत्त जयंतीला त्यांनी रुग्णालयातून व्हिडीओद्वारे संदेश आणि शुभेच्छा दिल्या होत्या. मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. आज बुधवारी ते राहत असलेल्या बुऱ्हाणनगर येथे दिंडी काढण्यात आली. त्यानंतर दुपारी चिंचोडी पाटील येथील आश्रमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.