ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शेती

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी येत्या 20 तारखेला आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रयत्नातून व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत बैठक झाली.

सध्या नागपूर अधिवेशन चालू असतात त्या दरम्यान ही बैठकी पाट पाहण्यासंदर्भामध्ये घेण्यात आली या बैठकीमध्ये पाट पाण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये शेतीसाठी मुळा पाटबंधारे विभागाच्या वतीने येत्या 20 तारखेला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुळा पटबंधारे विभागाच्या वतीने पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शेती

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विठ्ठलराव लंघे यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला होता तोच शब्द पाळत आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आज नागपूर येथे अधिवेशन दरम्यान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन येत्या 20 तारखेला शेतकऱ्यांसाठी पाटपाण्याचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय झाल्याचा माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.

शेती

येत्या २० तारखेला पाट पाण्याच्या निर्णयामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यातून सध्या लागवड होत ऊस तसेच व पेरणी होत असलेल्या गहू हरभरा पिकांसाठी मोठा दिलासा या पाट पाण्याच्या माध्यमातून मिळणार त्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नामध्येही वाढ होऊन पुढील काळामध्ये ही पाण्याची चिंता भेडसावणार नसल्याची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी बोलताना सांगितले.

या बैठकीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे, पाटबंधारे विभागाच्या अधिकारी सायली पाटील उपस्थित आदी होते .

शेती
शेती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेती
शेती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!