नेवासा – नेवासा येथील तालुका विद्या प्रसारक मंडळ संचलित कै.बदामबाई धनराजशेठ गांधी विद्यालयात स्वर्गीय धनराजशेठ गांधी यांची पुण्यतिथी व बदामबाई गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.शालेय शिक्षण घेत असतांना जीवनात उंच भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयवादी व निश्चयी बनण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी यावेळी बोलतांना केले.
विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तालुका विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण खंडाळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद मापारी, माजी अध्यक्ष कृष्णा डहाळे,महेश मापारी, सचिव शंकरराव नळकांडे,संचालक अभय गुगळे, सहसचिव विवेक नळकांडे,माजी विद्यार्थी सुधीर चव्हाण, शंकर नाबदे,मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून शाळेच्या प्रगतीचा अहवाल प्रास्तविकात सादर केला.बदामबाई गांधी जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव म्हणाले की, शालेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांनी जीवनात आपल्याला काय बनायचे याचे स्वप्न पहावे,जे काही बनायचे आहे त्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी जीवनात स्वयंशिस्तीला महत्व द्या,थोरामोठयांचा आदर करायला शिका,मित्र निवडतांना काळजीपूर्वक निवडा,आईवडीलांना विचारल्याशिवाय घर सोडू नका, शिक्षण घेत असतांना सोशल मीडिया पासून दूर रहाण्याचा प्रयत्न असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी यावेळी बोलतांना केले.

जाधव यांनी मुलांना विविध प्रश्न विचारून बोलते केले त्यांनी केलेल्या प्रश्नांवर समर्पक उत्तरे दिली.मुलींनी निर्भय बनण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक संजय चौधरी,प्रशांत खंडाळे,अजय आव्हाड,राजेंद्र नाईक, जनार्धन शिंदे, शिक्षिका श्रीमती सुरेखा चौगुले,श्रीमती सुलभा उंडे मॅडम,श्रीमती लता निकाळे,रमेश कुलकर्णी, राजेंद्र पटारे,पोलीस कॉन्स्टेबल अविनाश वैद्य, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक रविकांत मरभळ यांनी केले तर क्रीडा शिक्षक बाबासाहेब दहातोंडे यांनी आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.