नेवासा – सासरी नांदत असताना दवाखान्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना तालुक्यातील खुपटी येथे घडली असून याबाबत महिलेच्या फिर्यादीवरुन पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तारा रवींद्र डुकरे (वय २९) हल्ली रा. भेंडा बुद्रुक यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, ४ जून २०१५ रोजी ते दि. ६ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत वेळोवेळी मी माझे सासरी नांदत असताना माझे पती १) रवींद्र रामदास डुकरे, सासरा रामदास बारकु डुकरे, सासू संगीता रामदास डुकरे, दीर सागर रामदास डुकरे सर्व रा. खुपटी ता. नेवासा नणंद लक्ष्मी बाबासाहेब शिंदे (रा. शहरटाकळी ता. शेवगाव) मिना अर्जुन शिंदे (रा. सोनई) कुसुम सोमनाथ गायकवाड (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) यांनी तुला मुलबाळ होत नाही.

तू आम्हाला पसंत नाही. तुला जर आमचे घरी नांदायचे असेल तर तुझ्या आई वडिलांकडून दवाखान्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये नाहीतर तू आम्हाला फारकत दे असे म्हणून मला शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन उपाशीपोटी ठेवून शारिरीक व मानसिक त्रास दिला आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता ४९८ (अ), ३२३, ५०४, भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.