नेवासा – शहरातील खळवाडी भागात घरासमोर लावलेले मालवाहतूक वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रमाकांत रामचंद्र परभणे (वय ४८), धंदा-गाडी व्यवसाय रा. मधमेश्वर मंदिर रोड नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी माझे मेव्हणे शिवाजी बाळासाहेब मोरे यांचे नावावर अशोक लेलँड कंपनीची दोस्त मॉडेल असली गाडी (एमएच १७ बीवाय ०९८०) घेतलेली आहे.

२५ डिसेंबर रोजी रात्री ११ ते २६ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घरासमोर लावलेली साडेतीन लाख रुपये किमतीची गाडी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.