ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान स्व डॉ मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्लीत झाले होते. जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख लिखित हिंदी अर्धविराम पुस्तकाचे प्रकाशन.

सोनई – जेष्ठ साहित्यीक मा खा यशवंतराव गडाख यांनी माजी पंतप्रधान स्व मनमोहनसिंग यांच्या आठवणींना दिला उजाळा .
जेष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख यांनी सक्रिय राजकारणाबरोबरच समृद्ध साहित्य लेखन केले त्यांचे अर्धविराम हे आत्मचारित्र
साहित्य क्षेत्रात एक मापदंड झाले असुन हे पुस्तक मराठीसह,हिंदी, इंग्रजी भाषेत सुद्धा असुन याच्या अनेक आवृत्या प्रसिध्द झाल्या असुन सर्वसामान्य वाचकांपासून जगभरातील साहित्यप्रेमींना याची भुरळ पडली आहे. अर्धविराम या हिंदी आवृत्तीचे
प्रकाशन 30 मार्च 2007 रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्या हस्ते दिल्लीत संपन्न झाले होते. यावेळी राजकारणात राहून देखील माजी खा यशवंतराव गडाख यांनी विपुल साहित्य लेखन केले याबद्दल डॉ मनमोहनसिंग यांनी गौरवउद्गार काढले होते.

मनमोहन सिंग

पंतप्रधान पदावर असलेला व्यक्तीने मोठ्या व्यस्ततेतुन वेळ काढून साहित्यप्रति असलेली आपली रुची दाखवत पुस्तक प्रकाशन केले व पुस्तकाचे वाचन देखील करणार असल्याचे आवर्जून सांगितले होते व पुस्तक प्रकाशनप्रसंगी उपस्थितांशी आपुलीकने संवाद करून सर्वांची ख्याली खुशाली विचारली व मोलाचे मार्गदर्शन केले यामुळे आम्ही सर्व भारावून गेले असल्याचे माजी खा गडाख यांनी सांगितले.याप्रसंगी तत्कालीन केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे, तत्कालीन मंत्री पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री शंकरराव गडाख, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख,लेखक व प्रकाशक अरुण शेवते,आदी उपस्थित होते.

मनमोहन सिंग

जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ,केंद्रीय अर्थमंत्री, सलग दहा वर्षे पंतप्रधान असलेले स्व डॉ मनमोहन सिंग यांच्या यांच्या जाण्याने एक शांत संयमी मार्गदर्शक, मोठ्या आत्मीयतेने सर्व स्तरातील नागरिकांशी गमावला संवाद साधरणारा निगर्वी व्यक्तीमत्व आज गमावले असल्याचे जेष्ठ साहित्यीक माजी खा यशवंतराव गडाख यांनी सांगीतले तसेच सन 1991 मध्ये डॉ मनमोहन सिंग राज्यसभेचे खासदार व तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री होते तेव्हा खासदार म्हणूनही डॉ मनमोहन सिंग यांचे काम जवळून अनुभवता आल्याचे सांगत माजी खा यशवंतराव गडाख यांनी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला..

मनमोहन सिंग
मनमोहन सिंग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मनमोहन सिंग
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मनमोहन सिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!