गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी गावचे सुपुत्र ची संकेत ज्ञानदेव बेल्हेकर यांची मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत अहिल्यानगर येथे कनिष्ठ लिपिक पदी निवड झाली. या निमित्ताने गावातून त्यांची भव्य मिरवणूक व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.एक ग्रामीण भागातील तसेच शेतकरी कुटुंबातील संकेत ने शिक्षणाची यशस्वी वाटचाल केली असल्याचे त्यांचे वडील ज्ञानदेव बेल्हेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनई येथील महाराष्ट्र टायपिंग अँड शॉर्टहॅन्ड इन्स्टिट्यूट चे प्राचार्य प्रा. दत्ता हापसे सर, नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे. धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठान, ता. राहुरी चे अध्यक्ष राजूभाऊ शेटे, गणेशवाडी चे सरपंच कैलास पाटील दरंदले, सिद्ध समाधी योग चे शिक्षक डॉ हेमा वैरागर , विशेष पोलीस महानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले एकनाथ बेल्हेकर सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी त्याच्या सोबत निवड झालेल्या इतरही चाळीस विद्यार्थांचा सन्मान सोहळा या वेळी पार पडला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.