नेवासा : संस्थापक शिवाजीराव कपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सुरू करण्यात आलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट च्या माध्यमातून नेवासा व परिसरात अर्थकारणाबरोबरच समाजकारणातही संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली असल्याचे प्रतिपादन समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी केले. साई आदर्शच्या नेवासा शाखेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन डॉ.घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले, माजी सरपंच सतीश गायके,शिवसहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बालेंद्र पोतदार,अतुल सोनार,सोमनाथ वाखुरे,धनंजय नलघे,योगेश गावडे,नितीन शेंडे उपस्थित होते..

डॉ.घुले म्हणाले की आदर्शच्या जिल्ह्यात १७ शाखा असून त्यामध्ये स्वमालकीच्या नऊ ठिकाणी जागा आहेत येथील कपाळे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या संस्थेचा कारभारावर नेवासा व परिसरात विश्वास विश्वास निर्माण झालेला आहे जिल्ह्यातील पूर्ण शाखेमध्ये जवळपास २०० कोटी ठेवीचा टप्पा पार केलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेचा लेखाजोखा दरवर्षी दिनदर्शिकेमध्ये घेऊन संस्था सभासद ठेवीदार व नागरिकांपर्यंत पोहचून सामाजिक कार्यातही वेगळा उपक्रम राबवून संस्थेचे काम समाजापर्यंत पोहोचवण्याचे साई आदर्शाच्या माध्यमातून केले जात असल्याचे डॉ.घुले यांनी सांगितले, यावेळी शाखाधिकारी संदीप लोहकरे,सतीश पाटोळे,सत्यम ढाकणे,राहुल दारकुंडे उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.