ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
नितीन दिनकर

नेवासा – भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी श्री नितिन दिनकर यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे शिवसेनेत गेल्यामुळे त्यांच्या जागी रिक्त झालेल्या पदावर नेवासा तालुक्यातील श्री नितीन दिनकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. श्री नितीन दिनकर हे नेवासा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या माध्यमातून एक कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे या पदावर त्यांची निवड करण्यात आली आहे.

नितीन दिनकर

श्री दिनकर यांनी यापूर्वी नेवासा तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, श्रीरामपूर विधानसभा प्रमुख, प्रदेश प्रवक्ता, शिर्डी लोकसभा विस्तारक, शिर्डी लोकसभा संयोजक असे अनेक पदावर काम करून पदाला न्याय दिला आहे. त्यांच्या निवडीचे नेवासा तालुक्याच्या वतीने ठिकठिकाणी बॅनर लावून करण्यात आले तसेच नितीन भाऊ यांची राजकारणातील सुरुवात नेवासा तालुक्यातूनच झाली असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना मोठा अभिमान वाटत आहे. नक्की आपल्या सोबतच कार्य करणारा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीचा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष झाला त्यानिमित्त नेवासा भारतीय जनता पार्टी युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.

नितीन दिनकर

नितीन भाऊ दिनकर यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद सभापती ना. राम शिंदे सर, माजी खासदार सुजय दादा विखे पाटील, माजी आमदार वैभवराव पिचड, स्नेहलता कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, नितीन कापसे, सोशल मीडिया सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, जिल्हा सचिव प्रताप चिंधे, मनोज पारखे ,किसान मोर्चा जिल्हाध्यक्षअंकुश काळे, अशोक टेकने प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे ,अजित नरुला, कुणाल बोरुडे, अंकुश धंदक, विशाल धनगर ,पोपट शेकडे, राजू दराडे, अजय होन, राजेंद्र मुथा, व आमदार विठ्ठलराव लंघे मित्र मंडळ यांच्यावतीने नितीन भाऊ दिनकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले. युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील मित्र मंडळाच्या वतीने नेवासा तालुका भर ठीक ठिकाणी त्यांचे बॅनर लावून अभिनंदन करण्यात आले.

नितीन दिनकर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नितीन दिनकर
नितीन दिनकर
नितीन दिनकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नितीन दिनकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!