नेवासा – नुकत्याच झालेल्या गुरु काशी विद्यापिठ ,भटिंडा पंजाब येथिल अखिल भारतीय बिक्सिंग स्पर्धेत 66 किलो वजन गटात कुमारी प्रतिभा मनोज गायकवाड ( TYBA मानसशास्त्र )हिने नेत्रदिपक काम करत आपल्या काॅलजचे व गावाच्या नावात एक मौल्याचा तुरा लावला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापिठ अंतर्गत झालेल्या न्यु आर्टस् काॅलेज पारनेर येथिल जिल्हास्तरीय बाॅक्सिंग स्पर्धेत कुमारी प्रतिभा हिने सुवर्ण पदक पटकविले व तिची निवड निवड बी.जे.एस्.काॅलेज वाघोली पुणे येथे झोनल बाॅक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. तेथेही कुमारी प्रतिभा मनोज गायकवाड हिने नेत्रदिपक काम करत सुवर्णपदक पटकविले व तिने नाव पुढील होणार्या पंजाब भटिंदा येथिल बाॅक्सिंगसाठी नोंदविले.

गुरुकाशी विद्यापिठ , भटिंदा पंजाब येथे एकुन 12 मुलींचा संघ घेऊन श्री.विशाल परदेशी सर व सौ. हर्षल सुतार महिला प्रशिक्षक कोच म्हणुन सर्वांना प्रोत्साहन दिले.येथेही प्रतिभा हिने नेत्रदिपक काम करत चार राऊंड काढत आपल्या काॅलजचे व गावाचे नाव ऊज्वल केले. कुमारी प्रतिभा हिस सुरुवातीपासुन शाररीक शिक्षण संचालक डाॅ.विजय म्हस्के ,क्रिडा संचालक प्रा.संभाजी ढेरेसर ,तिचे कराटेचे मास्टर सचिन पवार सर , मास्टर आशोक शिंदे सर तसेच तिचे पालक श्री मनोज भाऊसाहेब गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या ह्या कामगिरी बद्दल कु. प्रतिभाचा चितळी गांवकरी पंचक्रोषी , मोहटा देवी मित्रमंडळ, जळगांव पंचक्रोषीतुन शुभेच्छांचा वर्षाव होत असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.