नेवासा – नेवासा शहरातील असलेल्या सर्वच दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाट्या दुकाणांवर लावण्याबाबत मनसेचे नेवासा शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे यांनी नेवासा तहसिलदार नगरपंचायत आणि नेवासा पोलीस ठाण्यात वारंवार निवेदने देवूनही याबाबत प्रशासनाकडून अद्यापही कुठलीच ठोस कारवाई झाली नसल्यामुळे आता नेवाशात मनसैनिक मोठे आक्रमक झालेले असून मनसे स्टॉईलने आंदोलन करुन प्रशासनाला धडा शिकविणार असल्याचा गर्भित इशारा माध्यमांशी बोलतांना शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे यांनी दिला.

यावेळी पिंपळे पुढे बोलतांना म्हणाले की,मराठी भाषाला अभिजात दर्जा मिळालेला नसून सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार दुकाने तसेच आस्थापनांवर मराठीत नामफलके लावण्याची मुदत ही केवळ २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंतच होती माञ मनसेने अनेकदा निवेदने देवून प्रशासनाकडून अद्याप कारवाई झालेली नसल्यामुळे मनसैनिक आणि पदाधिकारी आक्रमकपणे आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले. प्रशासनाच्या वतीने शहरातील काही दुकाने तसेच विविध आस्थापनांवर मराठीत नामफलकाच्या पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत असे आमच्या निदर्शनास आलेले आहे.

आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आपणास विनंती करितो की,आपण तातडीने अशा दुकानांचे तसेच आस्थपानांचे सर्वेक्षण करून तसेच दंडात्मक कारवाईच्या नोटीसा देण्यात याव्यात जेणे करून कुठेही कोर्टाने दिलेल्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेण्याची जबाबदारी असतांना तो काम मनसैनिक करत आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर व आस्थापनांवर मराठीत नामफलकाची पाटी लागलीच पाहिजे,अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणाऱ्या सुप्रीम कोर्टाचे अवमान कोणी करत असेल? तर त्यांना आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ याची दखल प्रशासनाने वेळीच घ्यावी असे आवाहनही शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे यांनी केले यावेळी मनसे पदाधिकारी अजय वैरागर,विकास खरे व पदाधिकारी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.