गणेशवाडी – केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिशिंगणापूर येथे येऊन आपल्या कुटुंबीयासमवेत शनि महाराजाचे दर्शन घेतले यावेळी नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर उपाध्यक्ष विकास बानकर देवस्थानचे विश्वस्त पोपटराव शेटे शनिशिंगणापूरचे पोलीस पाटील अॅड. सयाराम पाटील बानकर , भारतीय जनता पक्षाचे सुभाष पवार, सतीश कर्डिले अधिक कार्यकर्ते उपस्थित होते शिवराज सिंह चौहान हे दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थानला येत असतात.

यावेळी ते आपल्या कुटुंबीया समावेश शनिशिंगणापूरला येऊन अभिषेक व शनी चौथ्यावर जाऊन शनि महाराजांचे दर्शन घेतले शिवराज सिंह चौहान हे गेल्या १८ वर्षापासून न चुकता वर्षाच्या सुरुवातीलाच शनिशिंगणापूरला येत असतात मात्र यावेळी नियोजित कार्यक्रमामुळे ते एक दिवस उशिराने आले यावेळी त्यांच्या समावेत त्यांची पत्नी चिरंजीव कुणाल आधी परिवारातील सदस्य उपस्थित होते. महाराजाचे दर्शन घेऊन मनाला समाधान मिळते हे त्यांनी सांगितले आपण न चुकता वर्षाच्या सुरुवातीलाच शिर्डी येथे मुक्कामी येऊन दुसऱ्या दिवशी शनिशिंगणापूरला येत असतो मात्र नियोजित कार्यक्रमामुळे यावर्षी एक दिवस उशिरा यावे लागते यावेळी देवस्थानच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर उपाध्यक्ष विकास बानकर, पोपटराव शेटे अॅड.सयाराम बानकर यांनी त्यांचा शनि प्रतिमा श्रीफळ देऊन सन्मान केला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.