ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
आमदार

नेवासा – माझ्या कडून कुठल्याही प्रशासकीय अधिकारी वर्गाला त्रास होणार नाही मात्र तालुक्यातील कुठल्याही प्रशासकीय कार्यलयाबाबत शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकाच्या तक्रारी नको अश्या कडक शब्दात पहिल्याच बैठकीत आमदार लंघेनी नेवासे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कान टोचले.

दि.०२ रोजी नेवासे पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी ,प्रमुख कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार संजय बिरादार, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, गटविकास अधिकारी संजय लखवाल, मुख्यअधिकारी सोनाली मात्रे, उपअभियंता सुरेश दुबाले यांच्यासह भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष माऊली पेचे,युवा नेते ऋषिकेश शेटे,अंकुश काळे, प्रदीप ढोकणे, गणेश लंघे, आदिनाथ पटारे आदि उपस्थित होते.

आमदार

यावेळी तालुक्यातील महसूल, पोलीस , पंचायत समिती, नगरपंचायत,दुय्यम निबंधक, मुळा पाटबंधारे,भूमी अभिलेख, एसटी महामंडळ, वीज वितरण कंपनी, जीवन प्राधिकरण विभाग, पशु संवर्धन, जलजीवन, अश्या एकूण २२ विभागाची बैठक घेण्यात आली यात सामान्य नागरिकांच्या तक्रारी व शासकीय योजना, नवीन कार्यालय प्रस्ताव तसेच विविध अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी लंघे म्हणाले की मागील काळात अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून चुका झाल्या त्या पुढील काळात सुधारणा झाल्या पाहिजेत. विविध विभागाचे अधिकारी नागरीकांना त्यांचे काम घेवून आले असता कार्यालयात भेटत नाहीत, नागरीकांना कामासाठी चकरा माराव्या लागतात. या पुढे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतात बदल करावा जुन्या कामाचा निपटारा करा.

आमदार

आजच्या पहिल्या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत साधक बाधक चर्चा झाली, यात अतिशय समर्पक अशी उत्तरे मिळाली कामं करताना अधिकारी यांच्या देखील अडचणी असतात दोन्ही बाजू ऐकून घेणे हे माझे काम आहे यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी करेल. भविष्यात हातात हात घालून आपण सर्व जण कामे करू. लवकरचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांना भेटून प्रमुख कार्यालयातील रिक्त पदे भरून काढू जनतेला त्रास म्हणजे मला त्रास. आता जनता ही माझी जबाबदारी आहे भविष्यात चांगले कामे होतील हीच नूतन आमदार म्हणून अपेक्षा व्यक्त करतो.


दांड्या बहादर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? या बैठकीला काही विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? अशी चर्चा यावेळी सभागृहात सुरू होती.

newasa news online
आमदार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आमदार
आमदार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आमदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!