ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
महावितरण

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे महावितरण विभागा कडून येणारी वीज ही अत्यंत कमी दाबाने मिळत असल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.एकीकडे आज रोजी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा, गहू,ऊस,पालेभाज्या व पशुसंवर्धन चारा केलेला आहे.त्यात आता सर्व पिके पाण्यावर असून शेतकरी आपापल्या शेतात पाणी भरण्यासाठी लगबग करीत आहे.

महावितरण

पण महावितरण विभागा कडून केला जाणारा विद्युतप्रवाह अति कमी दाबाने सोडावीत असल्याने बरेश्या शेतकऱ्यांच्या पीक पाण्यावर असल्याने व कमी दाबाने विद्युतप्रवाह होत असल्याने विद्युतपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सोडणाऱ्या वीजप्रवाह मध्ये विद्युतपंपचे ऑटो देखील विद्युतपं प सुरू होत नाही.वीजप्रवाह कमी वेळेत, वीज कायमस्वरूपी वारंवार खंडित होण्याचे प्रमाण, यामुळे या भागातील शेतकरी या वीजप्रवाहाच्या समस्याने त्रस्त झाले आहे.

महावितरण

त्यात शेतीवाडी निवडणुकीच्या काळात नागरिकांना सिगलपेज सुरू करण्यात आली होती,ती देखील बंद करण्यात आली.तर काय म्हणे वीजप्रवाह कमी येत असल्याकारणाने शेतीत वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांना महावितरण विभाग कडून मिळणारी सिगलपेज बंद करण्यात आली.त्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होईल.पण ग्रामीण भागात शेतीवाडीची सिगलपेज बंद करून कोणत्याही प्रकारे वीज पुरवठा पूर्ण दाबाने सोडण्यात आला नाही.

महावितरण

आजून तर फक्त जानेवारी महिना उजेडाला तर ही परिस्थिती मग पुढील काळात काय?होणार या चिंतेने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.महावितरणच्या या कारभारावर शेतकऱ्यांचा रोष दिसून येत आहे.कमी दाबण्या येणाऱ्या वीजप्रवाह मुळे शेतकऱ्यांच्या विद्युतपंप जळत आहे,स्टार्टर ,ऑटो या सारखे वीज उपकरणे जळत आहे, मग याला कारणीभूत कोण?असा सवाल देखील शेतकरी उपस्थित करीत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आठ तासांसाठी मिळणार वीजप्रवाह पूर्ण दाबाने सोडण्यात यावा अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता वीजप्रवाह कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वीजप्रवाह पासून त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

महावितरण

रब्बी हंगामातील गहू,कांदा,ऊस,पालेभाज्या व पशुसंवर्धन चारा सध्या उन्हाच्या तिव्रते मुळे पाण्यावर आहे. हे सर्व पिकांना पाण्यासाठी शेतकरी लगबग करीत असल्यातरी महावितरण विभाग कडून शेतकऱ्यांना या कमी दाबाने मिळत असणाऱ्या वीजप्रवाह बाबद जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शेतकरी संघटना व शेतकऱ्यांना सह आज देणार निवेदन.

या अगोदर देखील शेतकऱ्यांनी कमी दाबाने व वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरवठा बाबद महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर चर्चा करून,निवेदन देऊन व आंदोलन केलेले आहे.पण कोणत्याही प्रकारे वीजप्रवाह मध्ये सुधारणा तर झाली नाही शिवाय आता तर शेतीवाडी मध्ये वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांची सिगल फेज देखील बंद केली.शेतकऱ्यांना कडे पाणी उपलब्ध असून विजेच्या समस्या मुळे रब्बी पिके धोक्यात.त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी महावितरण विभागा कडून काहीतरी उपायोजना तातडीने करण्यात येऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

महावितरण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महावितरण
महावितरण
महावितरण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महावितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!