ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
विज्ञान

गणेशवाडी – गणित – विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक ,डॉक्टर, इंजिनिअर तयार होऊन ,भारत देश जागतिक महासत्ता व्हावा , असा आशावाद नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी व्यक्त केला. ५२ व्या गणित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजे संभाजी माध्यमिक विद्यालय, कौठा येथे ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की,पूर्वीपेक्षा आता जवळजवळ प्रत्येक गावात माध्यमिक विद्यालये सुरु झाल्याने ग्रामीण भागातील मुलांपेक्षाही आजकाल मुली मुलांपेक्षा सर्वच क्षेत्रात बाजी मारत आहेत. या चिमुकल्या मधूनच भावी वैज्ञानिक निर्माण होऊन देशाच्या प्रगतीला निश्चितच हातभार लावल्या शिवाय राहणार नाहीत.

विज्ञान

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजा शिवछत्रपती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामदास गोल्हार होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, किसान मोर्चाचे अध्यक्ष अंकुश काळे, मुख्याध्यापक उद्धवराव सोनवणे, कौठ्याचे सरपंच प्रमोद गजभार, उपसरपंच कडूभाऊ मोहिते ,चेअरमन रावसाहेब शेळके,तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब काळे, जलभूमीचे संपादक बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष प्रशांत गोल्हार, डॉ.बाळासाहेब कोलते , विज्ञान अध्यक्ष तुकाराम फटांगरे, गणित अध्यक्ष संजय काळे, मार्गदर्शक सचिन कर्डीले, परीक्षा प्रमुख प्रकाश बोरुडे,महेश देशमुख,सचिव ईस्माइल शेख,केंद्र प्रमुख नामदेव दहातोंडे, रामलाल कर्डीले, नामदेव वाघमोडे, जयंत पाटील, ज्ञानेश्वर घावटे,दत्तात्रय गवळी,चामुटे सर, कांबळे,जे.एन‌.भारती,

विज्ञान

वाकचौरे,दिपक राऊत, सुधाकर आवारे,भाऊसाहेब जाधव, अंकुश आघाव, राहुल शिरसाठ, बापू काळे,अंबादास मिसाळ, माधवी जोशी,विजय दानवे,अशोक गायकवाड यांच्या सह नेवासा तालुक्यातील गणित विज्ञान संघटने चे सर्व सदस्य,सहभागी विद्यार्थी,पालक हजर होते. कार्यक्रमाचे स्वागत गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड यांनी केले. यावेळी जिल्हास्तरीय विज्ञान परीक्षेचे पारितोषिक वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक विज्ञान सचिव पांडुरंग बरे,तर सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र केकाण, शकुर शेख यांनी केले.

विज्ञान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विज्ञान
विज्ञान
विज्ञान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विज्ञान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!