एकता पञकार संघाच्या वतीने नेवासा फाटा येथे पञकार दिन व पुरस्कार वितरण समारंभ थाटात संपन्न..
नेवासा फाटा : पञकारितेला आता काळानुरुप प्रिंट मीडिया बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मोठे आव्हाण असून हल्लीच्या युगात पञकारिता क्षेञात समाजातील घडामोडींची क्षणार्धात बित्तंबात्तमी देत सामाजिक जागृता निर्माण करण्याचे काम पञकार करत असून या पुर्वीच्या काळामध्ये खेडे गावात सकाळी वृत्तपञ घरी येवू पर्यंत जिल्ह्यातील घडामोडी सर्वसामान्य जनतेला समजत नव्हत्या आता माञ पञकारितेत मोठे बदल होवून जलदगतीने सामाजिक घडामोडींचे आकलन पञकारितेच्या माध्यमातून होत असते त्यामुळे पञकारांनी या स्पर्धेचे युगात वास्तवतावादी पञकारिता करुन राजकारण आणि समाजकारणात लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्याचे आवाहन नेवासा तालुक्याचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी सोमवार (दि.६) रोजी झालेल्या नेवासा फाटा येथील ञिमुर्ती शैक्षणिक संकुलात आयोजित नेवासा तालुका एकता पञकार संघाच्या पञकार दिन व पुरस्कार वितरण समारंभाप्रसमगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नेवासा फाटा येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज,प्रादेशिक परिवहन खात्याचे वाहन निरिक्षक अनंता जोशी,नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक धनंजय जाधव,ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगेपाटील,नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार,समर्पन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जेष्ठ नेते रामराव पाटील भदगले,कृषी शास्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे,गणेशराव लंघे,मुकिंदपूरचे सरपंच दादा निपुंगे,भाजपाचे नेते अंकुशराव काळे,शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रावसाहेब घुमरे,एकता पञकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
नेवासा तालुका एकता पञकार संघाच्यावतीने आयोजित पञकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेञात उत्तुंग भरारी घेत शिक्षणाची जिल्ह्यासह परजिल्ह्यात मोठी दालने उभी करुन ज्ञानार्जन करणाऱ्या ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगेपाटील यांना शिक्षण महर्षी पुरस्कार देवून गौरविण्यात आले तर पञकारिता क्षेञात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भेंडा येथील कारभारी गरड,घोडेगांव येथील दिलीप शिंदे तर बालाजी देडगांव येथील बन्सी एडके यांना दर्पण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील बोलतांना पुढे म्हणाले की,विधानसभा निवडणूकीत जनतेने मला निवडून दिल्यानंतर आता अनेकांच्या मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे आपण केवळ निवडणुकी पुरतेच राजकारण करुन स्व.वकिलराव अण्णा लंघे यांच्या जुन्या पिढीचे संस्कार जपत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याची ग्वाही यावेळी बोलतांना आमदार लंघे यांनी उपस्थितांना दिली तालुक्यातील सर्वच पञकार आमचे मिञ असून पञकारांनीही मला सदैव नेहमीच साथ दिलेली असून आता विकास कामे करण्यासाठी पञकारांनी मार्गदर्शकाची भूमिका बजाविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी पञकारांना केले.
यावेळी बोलतांना श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज यांनी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी धक्क्यावर धक्के घेत विधानसभा निवडणूकीत विजयी मिळविलेला आहे ते पहीले क्लिनर होवून मग ड्रॉईव्हर झाल्यामुळे त्यांना कामाचा मोठा अनुभव असून त्याचा फायदा विकास कामाबाबत समाज घटकाला होणार असल्याचे गौरोद्गार यावेळी बोलतांना महंत सुनिलगिरी महाराज यांनी काढले तर प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन निरिक्षक अनंता जोशी यांनी हल्लीच्या जमान्यात खुनापेक्षा अपघातात मृत्यु होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे सांगून वास्तवात याचे स्पष्टिकरण आणि अनेक कारणे विषद करुन प्रबोधन केले तर पोलास निरिक्षक धनंजय जाधव,ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पञकार राजेंद्र वाघमारे,संदिप गाडेकर, चंद्रकांत दरंदले,सतीश उदावंत,अशोक पेहरकर,विनायक दरंदले, इक्कबाल शेख,युन्नूस पठाण,मकरंद देशपांडे,नामदेव शिंदे,गणेश बेल्हेकर,अभिषेक गाडेकर, सौरभ मुनोत, सचिन कुरुंद,सुधाकर होंडे,बाळासाहेब पंडीत, राहूल कोळसे,विकास बोर्डे,विलास धनवटे,सोमनाथ कचरे, देविदास कचरे,मोहन शेगर,अशोक भुसारी,राहूल चिंधे,संतोष सोनवणे,विठ्ठल उदावंत यांच्यासह तालुक्यातील पञकार यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमास मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे,सामाजिक कार्यकर्ते महेश कांडके,शहर कॉंगेसचे अध्यक्ष अंजूम पटेल यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेञातील मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदिप गाडेकर,राजेंद्र वाघमारे,अशोकराव पेहरकर,चंद्रकात दरंदले,सतिष उदावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
ञिमुर्ती पावन प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगेपाटील यांच्यावतीने नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार लंघे यांची वाजत – गाजत विद्यार्थ्यांनी सलामी देवून स्वागत केले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा : ७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.