अनाथ मुलांना दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप तालुकाभरातून उपक्रमाचे कौतुक
नेवासा – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव प्रताप चिंधे पाटील यांचा वाढदिवस तालुका भर ठीक ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने प्लेस बोर्ड व होणारा अनावश्य खर्च न करता तो टाळून वाढदिवसानिमित्त भानस हीवरा येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील मुलांना विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यामध्ये वही ,पेन , टूथब्रश, अंगाच्या साबण ,कपड्याच्या साबण, पावडर शाम्पू ,बॉडी लोशन ,व्हॅसिलिन या आणि अशा अनेक वस्तू त्यासोबत खाऊचे देखील वाटप प्रतापराजे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले ,कार्यक्रमाप्रसंगी अनेक राजकीय क्षेत्रातील मातब्बर मंडळी यांनी उपस्थिती लावली.

त्यामध्ये नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, तसेच नेवासाची भूमिपुत्र पंचगंगा शुगर प्रा.लिमिटेड चे चेअरमन प्रभाकरजी शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हा जिल्हा अध्यक्ष नितीनजी दिनकर जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा, भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे, महाराष्ट्र राज्य मराठा महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संभाजी राजे दहातोंडे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार शिवसेनेचे विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ,पसायदान प्रतिष्ठानचे शिवाभाऊ पाठक, पप्पू भाऊ परदेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव लोखंडे, डॉ. अविनाश काळे ,राजेंद्र काका मते,पैलवान कुंडलिक दादा चिंधे, लक्ष्मणराव मोहिते, देविदास साळुंखे, अशोक कदम, सोमनाथ शेंडे, किशोर भनगे,

अमोल भाऊ गुजर,बद्रीनाथ चिंधे, रविकांत शेळके,अंबादास उंदरे, राहुल रोटे,दारकुंडे बापूसाहेब, भाजपचे प्रसिद्ध प्रमुख आदिनाथ पटारे,पोलीस पाटील विठ्ठल शेंडे, सतीश गोडसे, प्रकाश वाघमारे,सरपंच भरत बेलेकर,एसबी शेटे साहेब, नानाभाऊ डौले, आकाश सानप, माऊली आठरे बंडू कोतकर,पोपटराव शेकडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्यानंतर सोनई येथे राजळे वस्ती वस्ती वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी ढोल , व सर्व मुलांसाठी लेझीम संच देण्यात आला. वाढदिवसानिमित्त माळीचिचोरा, निपाणी निमगाव, उस्थळ दुमाला, नेवासा फाटा, नेवासा शहर, खेडले परमानंद, बेलेकर वाडी, सोनई, गोमळवाडी, वाटापुर, पुणतगाव, पाचेगाव , कारेगाव, बाबुळवेढा, आदी ठीक ठिकाणी वाढदिवस रात्री उशिरापर्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मिळून भाजपचे जिल्हा सचिव प्रताप राजे यांना भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेकांनी आपल्या भाषणात संबोधित करून शुभेच्छा दिल्या. आणि कार्यक्रमाप्रसंगी मित्रमंडळींच्या वतीने अनेकांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये सूत्रसंचालन पोपट शेकडे केले व शेवटी सर्वांचेआभार युवा नेते कुणाल बोरुडे यांनी मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.