ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
धनंजय मुंडे

धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून ओबीसी नेत्यांना टारगेट केलं जात असल्याचा निषेध म्हणून मोठं आंदोलन होणार आहे.

राज्यभर संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याठी प्रचंड दबाव वाढला असून विरोधकांसह स्वपक्षीयांनीही धनंजय मुंडेंना घेरल्याचं पहायला मिळत असताना आता मदतीसाठी ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके (Lakshman Hake) मैदानात उतरणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी समाज आंदोलन करणार असून निदर्शने आणि सभा घेणार आहेत. आज (8 जानेवारी) दुपारी बारा वाजता मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते नवनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या आरोपींना कडक शासन करावं तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून ओबीसी नेत्यांना टारगेट केलं जात असल्याचा निषेध म्हणून मोठं आंदोलन होणार आहे.

धनंजय मुंडे

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे विरोधकांनीही हे प्रकरण चांगलेच लावून धरले असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचा आरोप करत मुंडेंच्या बचावासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार आहेत. 

छ. संभाजीनगरमध्ये हाकेंच्या नेतृत्वात आंदोलन

छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात ओबीसी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि सभा आयोजित करण्यात आली आहे.ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी बारा वाजता शहरातील मुख्य क्रांती चौकात हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते नवनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात येणार असून ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्याचा आरोप करत हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी समाज एकवटणार आहे.

धनंजय मुंडे

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी 

दरम्यान, ज्यांनी कुणी हा गुन्हा केलाय त्यांना या प्रकरणाचं गांभीर्यच नाही. त्यामुळं याप्रकरणी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या लोकांवर अजूनही संशय आहे. त्या लोकांवर विविध गुन्हे असतानाही पोलीस संरक्षण दिले गेले होते. मात्र आता या प्रकरणाची गृह खात्याने दाखल घेण्याची गरज आहे असंही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. 

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धनंजय मुंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!