ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
खुन

नेवासा – दिनांक २७/१०/२०२३ रोजी झालेल्या गळनिंब ता. नेवासा येथील प्रविण सुधाकर डहाळे यांचे खुन प्रकरणातील गुन्हा रजि नंबर १०१८/२०२३ नेवासा पोलिस स्टेशन मधील आरोपी नामे बंडू भिमराज साळवे रा. बाबुर्डी बेंद ता.जि. नगर आरोपी यास जामिन मंजुर झालेला आहे. सदर घटना अशी की, दि.२७/१०/२०२३ रोजी रात्री ६.०० सुमारास आरोपी नामे शेखर अशोक उर्फ खंडू सतरकर २) अशोक उर्फ खंडू किशोर सतरकर ३) दिपक सावंत ४) माऊली उर्फ अरुण दत्तात्रय गणगे, ५) किशोर पटारे ६) जालिंदर बिरुटे वगैरे दोन तिन इसम यांचे विरुध्द गुन्हा दाखल झाला होता.

खुन

सदरील आरोपी यांनी कोयते व तलवार या सारख्या धारदार हत्याराने अंगावर सपासप वार करुन व इतर आरोपींनी लोखंडी रॉड व दांडयाने मारहाण केली. अशा मजकूराची फिर्याद नेवासा पोलिस स्टेशनला दाखल झाली होती. त्यानंतर आरोपी नं.५ बंडु भिमराज साळवे यांने अ‍ॅड. निखील ढोले पाटील याचे तर्फे जामिनासाठी मे. नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब यांचे समोर आरोपी यांचे वतीने जामिन अर्ज ठेवला होता सदरचा अर्जावर युक्तीवाद होवुन सदरचा अर्ज आरोपी यांचे वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी याची जामिनावर अटी व शर्तीसह जामिन मंजुर केलेला आहे. तरी आरोपी तर्फे अ‍ॅड. महेश तवले यांचे मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. निखील ढोले पाटील यांनी कामकाज पाहिले आहे.

खुन
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खुन
खुन
खुन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खुन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!