गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील मोरे चिंचोरे येथून रात्रीच्या वेळेला मुरमाची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून रात्रीच्या वेळेला सोनई वांबोरी रस्त्याने प्रवास करणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे कारण ही वाहने प्रचंड वेगाने व प्रखर हेडलाईट मुळे समोरून येणाऱ्या छोट्या वाहन चालक यांना रस्ता व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे हे छोटे वाहन चालक घसरून पडत आहे त्यामुळे प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटना घडल्यानंतर याला आवर घालणार का त्यातच सोनई वांबोरी रस्त्याचे काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे. तेथे खडी व त्यावर मुरूम टाकला आहे मात्र बरेच दिवस उलटुन सुद्धा काम सुरू न झाल्याने खडी उघडी पडली आहे .

त्यामुळे या रस्त्यावरून छोट्या वाहनांना प्रवास करणे अवघड होऊन बसले आहे त्यातच महसूल यंत्रणा व स्थानिक पोलीस यांचे आशीर्वादाने मोरे चिंचोरे येथून रात्रीच्या वेळेला मुरमाची वाहतूक सुरू असल्याने नागरिकामध्ये नाराजी दिसून येत आहे. या आधी रस्त्यावर याच कारणामुळे छोटे मोठे अपघात घडले आहे. या मुरुम वाहतुकीला घोडेगाव चे मंडलाधिकारी यांची मुख संमती असल्याचे बोलले जात आहे घोडेगावच्या मंडळाधिकारी यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहे तरीसुद्धा वरिष्ठानकडून यांना का पाठीशी घातले जात आहे .असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे. अहिल्यानगर येथून येणारी कचकडी व इतर डंपर द्वारे होणारी वाहतूक यामध्ये सुद्धा या मंडळ अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यावी लागत असल्याची चर्चा सुरू आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.