ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
Horoscope Today

Horoscope Today 10 January 2025 : आज आज शुक्रवार, १० जानेवारी वृषभ राशीतील चंद्र गुरू ग्रहासोबत असल्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून या दिवशी शुभ योगासह शुक्ल योगही तयार होत आहे. तसेच कृतिकानंतर रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग होईल. त्यामुळे काही राशींना आजचा दिवस शुभ असणार आहे. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा आहे.

मेष – काळजी सतावेल

आज तुम्हाला मुलांच्या भविष्याची काळजी सतावेल. तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रिय व्यक्ती तुमच्यावर रागवू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे तुम्ही आनंदी अशाल. काम करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांची मदत मिळेल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.

वृषभ – महत्त्वाचे निर्णय घ्याल.

तुमचे शत्रू नोकरी आणि व्यवसायात अडथळे निर्माण करतील. वरिष्ठांच्या मदतीने त्यावर मात कराल. मालमत्तेसंबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा.

Horoscope Today


मिथुन- पैसे खर्च होतील

आज तुमची आवडती हरवलेली वस्तू मिळू शकते. ज्यामुळे आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांना दिलेले वचन पूर्ण कराल. कोणत्याही शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. पालकांसोबत बाहेर जाण्याची योजना बनवाल. तुम्ही इतरांच्या मदतीसाठी काही पैसे खर्च कराल.
आज भाग्य ९७ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा.

कर्क – अडथळे येतील

आज व्यवसायात अडचणी येतील. तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. वरिष्ठांचा सल्ला घ्या. तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. कुटुंबातील मुलांना भविष्याची चिंता सतावेल. नातेसंबंध सुधारतील. महत्त्वाच्या ठिकाणी प्रवास होईल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्नवस्त्र दान करा.

Horoscope Today


सिंह – वाद संपतील

आज तुमच्या कौटुंबिक मालमत्तेबाबत वाद सुरु असतील ते संपतील. तुम्हाला संपत्ती मिळू शकते. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. मनात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जांना दूर करा.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा.

कन्या – चिंता वाढेल

आज कामे उत्साहाने कराल. तुम्हाला समान परिणाम मिळतील. तुमची चिंता वाढू शकते. काही समस्यांना सामोरे जाल. व्यवसायात बदल करण्याचा विचार कराल. नात्यात समस्या येतील.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीशिव चालीसाचे पठण करा.

Horoscope Today


तुळ – नात्यात तडजोड

आज प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना नात्यात तडजोड करावी लागेल. फायदे-तोटे लक्षात घ्या. घरात नवीन ऊर्जा पाहायला मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. व्यवसायात वाद होऊ शकतात.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करा.

वृश्चिक – जोडीदाराचा पाठिंबा मिळेल

आज तुमच्या ऑफिसचे वातावरण चांगले असेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. वडिलांच्या आरोग्याबाबत चिंतेत असाल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्याचे ठरवले तर जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचे पूजन करा.

धनु – पदोन्नती मिळेल

आज पैशांशी संबंधित समस्या येतील. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना अपयशाचा सामना करावा लागेल. सरकारी नोकऱ्यांसी संबंधित लोकांची पदोन्नती होईल. मित्रांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.

Horoscope Today


मकर – सावध राहा

आज तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावे लागेल. अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. कौटुंबिक जीवनात वेळ घालवाल. ऑफिसमध्ये काही खास काम सोपवले जाईल. तुम्ही थोडे चिंतेत असाल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा.

कुंभ – चिंता सतावेल

आज तुमच्या व्यवसायासाठी काही काम कराल ते पूर्ण होईल की, नाही याची चिंता सतावेल. मनात सकारात्मक विचार ठेवून काम करा. नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. राजकीय घडामोडी वाढतील. आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.

मीन – नुकसान होईल

आज कोणाशी व्यवहार करत असाल तर काळजीपूर्वक करा, अन्यथा डोकेदुखी वाढेल. तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमची आर्थिक परिस्थिती अस्थिर होऊ शकते. आज कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मोठे नुकसान होईल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाला तेल अर्पण करा

Horoscope Today
Horoscope Today

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope Today
Horoscope Today
Horoscope Today

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope Today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!