नेवासा – तालुक्यातील मक्तापुर याठिकाणी सालाबाद प्रमाणे राजमाता जिजाऊ जयंती सोहळा व पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दि.१२/०१/२०२५ रोजी सायं.०६ वाजता करण्यात येणार आहे.सदर जयंती सोहळ्यामध्ये राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून,येणार्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत तसेच श्रीमती प्रिया सुभाष प्रभुणे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार,डॉ.करणसिंह घुले यांना मराठा भूषण पुरस्कार,श्री.अभिषेक शिवाजी गाडेकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार तसेच कु.प्रणाली मायकल साळवे या शालेय विद्यार्थिनीस कै.रामराव पा.लहारे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदर जयंतीच्या कार्यक्रमास ना.शंकरराव गडाख साहेब,शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे,व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव साहेब,महंत सुनिलगिरीजी महाराज,श्री.ज्ञानेश्वर महाराज हजारे उपस्थित राहणार आहेत.तरी सदर जयंती सोहळ्यासाठी मक्तापुर व परिसरातील सर्व नागरिकांनी यावे अशी विनंती आयोजक मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.गणेश झगरे यांनी केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.