केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या दर्शनाला येणार असून त्यासाठी शिंगणापूर देवस्थान कार्यालयात शुक्रवारी सकाळी सुरक्षा व्यवस्थेकामी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सरकारी यंत्रणेच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांची तर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दुपारी देवस्थान पदाधिकारी यांचे सह स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक घेवून काही सूचनाही केल्या.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या शिंगणापूर दर्शन दौऱ्यानिमित्त शुक्रवारी सकाळी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी देवस्थान जनसंपर्क कार्यालयात बैठक घेतली. सुरक्षा व्यवस्थेसंबंधी मार्गदर्शन केले. सी.आर.पी.एफ व बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे अधिकारीही यावेळी बैठकी दरम्यान उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शनिशिंगणापूरला सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष भागवत बनकर यावेळी उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, देवस्थान अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, सचिव अप्पासाहेब शेटे, कोषाध्यक्ष दीपक दरंदले, विठ्ठल आढाव, शिंगणापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक खगेंद्र टेंभेकर आदी या बैठकीस उपस्थित होते.
तसेच दुपारी देवस्थान कार्यालयातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री शाह यांच्या शिंगणापूर दर्शन दौऱ्यासंबंधी देवस्थान समिती व स्थानिक कार्यकत्यांची बैठक घेतली.

या बैठकीदरम्यान देवस्थान समितीचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, सयाराम बानकर, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबमें, प्रांताधिकारी सुधीर पाटील, पोलिस उपाधीक्षक सुनील पाटील, तहसीलदार संजय बिरादार, शिंगणापूर देवस्थान माजी विश्वस्त सयाराम बानकर, ऋषिकेश शेटे आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.