सोनई – नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील माऊली आश्रमामध्ये हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पंचमदिनी तुळसी अर्चना महापुजा नाम जप व किर्तन महोत्सवास शनिवार दि.११ जानेवारी रोजी श्रीराम साधना आश्रमाचे महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहणाने भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला.धर्माचे पालन व रक्षण करणे ही काळजी गरज असून धर्माच्या पालनासाठी प्रत्येकाने आपापले कर्तव्य चोखपणे बजवावे असे आवाहन महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी महंत सुनीलगिरीजी महाराज,मुकाई देवस्थानचे महंत गोपालानंदगिरीजी महाराज,मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज,माऊली आश्रमाचे प्रमुख महंत हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे,गोधेगाव येथील हभप सीताराम बाबा पठाडे,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र महाराज गिरे,समधन महाराज कन्हेरकर, पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे, दत्ताभाऊ कांगुणे,सरपंच पोपटराव हजारे,खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी आलेल्या भाविकांचे माऊली आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी स्वागत करून उपस्थित संत महंतांचे संतपूजन केले.सर्व भक्त परिवाराच्या पाठबळामुळे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी निधीतून केलेल्या सहकार्यामुळे आश्रमाची वाटचाल सुरू झाले असल्याचे सांगितले. इतर नेतेमंडळी व भक्त गणांच्या योगदानातून माऊली आश्रमाला उत्कर्षाकडे न्यायचे आहे त्यामुळे सर्वांनी खंबीर साथ धर्म कार्याला द्यावी असे आवाहन ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी बोलतांना महंत सुनीलगिरीजी महाराज म्हणाले की हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी सर्व भक्त गणांना एकत्रित करून माऊली आश्रमाची उभारणी केली आहे त्यामुळे अनेकजण अध्यात्माकडे वळाले आहे,धर्म कार्य आश्रमाच्या माध्यमातून होत असल्याने सर्व भक्तांनी तन मन धनाने या आश्रमासाठी हातभार लावावा असे आवाहन केले.

या प्रसंगी महंत श्री गोपालानंदगिरीजी महाराज,योगी ऋषिनाथजी महाराज,रावसाहेब कांगुणे,नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण,खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे, दत्ताभाऊ कांगुणे यांनी आपल्या मनोगतातून सोहळयास शुभेच्छा दिल्या. संतसेवक अंबादास गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर माऊली आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब आखाडे,मुकींदपुरचे माजी सरपंच अशोक निपुंगे,गोरक्षक अनिल पठाडे,चेअरमन भगवानराव शेजुळ, सोपानराव शिंदे,उपसरपंच संदीप गव्हाणे,श्रीकांत बनसोडे,ग्रा.पं. सदस्य जगदीश शेजुळ,सोन्याबापु डिवरे,कचराप्पा हजारे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंदू गव्हाणे यांच्यासह समस्त भजनी मंडळ, पिचडगाव ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.