गणेशवाडी – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे दर्शन घेवून पूजा केली.दुपारी दोन वाजता घोडेगाव येथील हेलीपॅडवर आगमन झाले. यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते शनिदेवाच्या मूर्तीस तेल अर्पण करत उदासी महाराज मठात अभिषेकही या वेळी करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी शहा यांना संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती भेट देऊन सन्मान केला.

पाटील, प्रभाकर शिंदे, सचिन देसरडा,अॅड.सयाराम बानकर,यांच्याशी शहा यांनी हस्तांदोलन करत देवस्थानचे उत्पन्न तसेच सुख सुविधा या बाबतीत विचार पुस केली. अंकुश काळे, मनोज पारखे, ऋषिकेश शेटे, प्रताप चिंधे, माऊली पेचे, बाळासाहेब पवार, भाऊसाहेब कर्डक आदी उपस्थित होते. शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. तत्पूर्वी श्री. शाह यांचे हेलिपॅडवर आगमन झाले. अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.