नेवासा – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात अहील्यानगर जिल्ह्यात प्रथम आलेली शाळा श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुकिंदपुर येथे दिनांक 11 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलताना पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांनी गौरवोद्गार काढले. विद्यालयात संगीत , कबड्डी ,खोखो, क्रिकेट , व्हॉलीबॉल, रायफल शूटिंग, बॅडमिंटन , धनुर्विद्या, घोडेस्वारी, कुस्ती, बॉक्सिंग अशा राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना त्यांनी सांगितले की गौरवशाली इतिहास हा गुरुकुल शिक्षण पद्धतीने घडवलेला आहे.

त्रिमूर्ती मध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देतानाच ध्यानधारणा, सैनिकी प्रशिक्षण, देशी विदेशी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते , ही अभिमानाची बाब आहे. संस्कारक्षम विद्यार्थी ही त्रिमुर्तीची ओळख असून 21व्या शतकात त्रिमूर्ती देश पातळीवर नक्की नेतृत्व करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे ,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, संस्थापक साहेबराव घाडगेपाटील, अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण पाटील, सचिव मनीष घाडगे, गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड साहेब, शुक्ला साहेब,प्राचार्य सचिन कर्डिले , प्राचार्य जितेंद्र पाटील ,विभागप्रमुख ताके सर आदी मान्यवर उपस्थित होते. एन सी सी विद्यार्थ्यांच्या परेडने अमर जवान स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाने कर्यक्रमाची शोभा वाढवली .

त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे कौतुक केले. दारूबंदी विषयावर समाजप्रबोधन करणारे नाटक हे विशेष आकर्षण होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक चौहान सर यांनी केले, सूत्रसंचलन प्रा दळे सर व प्रा देशमुख सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी विभागप्रमुख निंबाळकर सर, कापसे सर, कात्रस सर, भस्मे सर, सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले . आभार प्रा. निलेश घाडगे यांनी मानले . शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.