ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
धर्म

पंचदिनी तुळशी अर्चना महापूजा महोत्सवास धर्मध्वजारोहणाने प्रारंभ

नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील माऊली आगमामध्ये ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पंचमदिनी तुळसी अर्चना महापूजा नाम जप व कीर्तन महोत्सवास श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहणाने भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला. धर्माचे पालन व रक्षण करणे ही काळची गरज असून धर्माच्या पालनासाठी प्रत्येकाने आपापले कर्तव्य चोखपणे बजवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

धर्म

मुकाई देवस्थानचे महंत गोपालानंदगिरी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी ऋषिनाथ महाराज, माऊली आश्रमाचे महंत ज्ञानेश्वर महाराज हजारे, गोधेगाव येथील सीताराम बाचा पठाडे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र महाराज गिरे, समाधन महाराज कन्हेरकर, पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे, दत्ता कांगुणे, सरपंच पोपटराव हजारे, खासदार भाऊसाहेच वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते.

ह भ प हजारे महाराज यांनी स्वागत करून उपस्थित संत महंतांचे संतपूजन केले. सर्व भक्त परिवाराच्या पाठबळामुळे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी निधीतून केलेल्या सहकार्यामुळे आगमाची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. भक्त गणांच्या योगदानातून माऊली आगमाला उत्कर्षांकडे न्यायचे आहे. सुनीलगिरी म्हणाले की, हजारे यांनी सर्व भक्तगणांना एकत्रित करून माऊली आगमाची उभारणी केली आहे. त्यामुळे अनेकजण अध्यात्माकडे वळाले आहे. धर्मकार्य आगमाच्या माध्यमातून होत असल्याने सर्व भक्तांनी तन-मन-धनाने या आगमासाठी हातभार लावावा.

धर्म

यावेळी गोपालानंदगिरी, ऋषिनाथ महाराज, रावसाहेब कांगुणे, नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण, सोनवणे, दत्ताभाऊ कांगुणे यांनी मनोगत व्यक्त केले. अंबादास गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले तर हजारे यांनी आभार मानले. बाजार समितीचे संचालक बाबासाहेब आखाडे, मुकीदपुरचे माजी सरपंच अशोक निपुंगे, गोरक्षक अनिल पठाडे, भगवानराव शेजुळ, सोपानराव शिंदे, उपसरपंच संदीप गव्हाणे, श्रीकांत बनसोडे, सदस्य जगदीश शेजुळ, सोन्याबापु डिवरे, कचराप्पा हजारे, चंदू गव्हाणे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

धर्म
धर्म

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धर्म
धर्म

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धर्म

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!