ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
स्नेहसंमेलन

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील अदिती फाऊंडेशन चे किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. अध्यक्ष स्थानी बिज माता बिजमाता पद्मश्री राहीबाई पेरे या होत्या. मि जरी शाळा शिकलेली नसले तरी मि या मातीशी नाळ जोडली. उस तोडणी करताना करता स्थापन केलेल्या बचत गटांना ति तयार केलेली रोपे वाटप करत होती. सध्या च्या युगात केमिकल युक्त खताचा होत असलेला वापर हा माझ्या जिवारी लागला. त्याचे दुष्परिणाम मि भोगले. तेव्हा पासून मि सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. या साठी घरगुती बि तयार करुनच त्यांची लागवड केली पाहिजे तेव्हाच आपण रोग मुक्त होऊ असे बिजमाता राहीबाई पेरे यांनी बोलताना सांगितले.

स्नेहसंमेलन

विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन २०२३/२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धा तसेच शैक्षणिक स्पर्धा मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित मान्यवर तसेच पालकांचे मन जिंकले. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका किर्ती बंग व सचिन बंग यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. कोळीगितावरील बालचमुंच्या सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांचे मन जिंकले.

स्नेहसंमेलन

या वेळी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, कोपरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिष शेळके, ओम शांती च्या उषा दिदि, गणेश बेल्हेकर, अशोक भुसारी, अश्विनी बानकर, मंगल बानकर, किरण सोनवणे, प्रस्तावना हनुमंत फटाले सर यांनी केले तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका किर्ती बंग यांनी मानले. विद्यालयातील शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्नेहसंमेलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!