जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत क वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधीतून नाथबाबा मंदिर व खंडोबा म्हाळसा मंदिराला वीस लाख निधी.
नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री माननीय नामदार राधाकृष्ण जी विखे पाटील यांच्या मदतीने जिल्हा नियोजन मधून क वर्ग देवस्थान तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत नेवासा बु.येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आज नेवासा तालुक्याचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यामध्ये श्री विश्वेश्वर नाथबाबा मंदिर ट्रस्ट, येथे परिसर सुशोभिकरण करणे रक्कम : १० लक्ष,श्री खंडोबा (म्हाळसा माहेर) सच्चिदानंदबाबा (ज्ञानेश्वरी लेखक)व नारदमुनी मंदिर देवस्थान,येथे परिसर सुशोभिकरण करणे.रक्कम : १० लक्ष भुमिपूजन आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते झाला.

नेवासा बुद्रुक ग्रामस्थांचे आमदार विठ्ठल राव लघे यांनी निवडणुकीत भरभरून साथ दिल्याबद्दल आभार मानले व अनेक ग्रामस्थांचे प्रश्न निवेदनादाने स्वीकार केले व त्यांना आश्वासित केले की लवकरच भरगच्च निधी नेवासा बुद्रुक साठी उपलब्ध करून विकास कामांमध्ये कुठलीही कसर राहणार नाही याची ग्वाही दिली कार्यक्रमाप्रसंगी संजूबाबा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी प्रमुख उपस्थिती मा.प्रा.श्री.कैलास माने,शिवसेना तालुका प्रमुख जामखेड, नेवासा विधानसभा प्रमुख श्री भाऊसाहेब वाघ,कर्जत युवा सेना तालुका अध्यक्ष सोमनाथ शिंदे, श्री जगन्नाथ दादा जपे,

नाथबाबा मंदिर देवस्थान ट्रस्ट समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जायगुडे, श्री.संजय गायकवाड,श्री आणा पेचे,.सुनील हापसे, नानासाहेब डौले, अनिल हापसे ,सुनील जायगुडे ,नितीन सोनवणे ,आकाश परदेशी , शिवेंद्र पवार ,जय पावर , नाना सुरोशे , संतोष कुटे ,बालू कोकणे ,निखिल हापसे, अंबादास रोडे, कुणाल बोरुडे अमोल फुलकरआदिनाथ पटारे,विकी सोनवणे आदी नेवासा बुद्रुक परिसरातील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.