ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
आरोपी

नेवासा – नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत असलेले साईनाथनगर येथे दिनांक १ जानेवारी रोजी सायंकाळी ०६:३० वा. शेतात मजुरीचे काम संपून श्रीरामपूर – नेवासा रोडने फोनवर बोलत चालत घरी जात असलेल्या सुनिल पुंडलीक उमाप या शेतमजुराचा अज्ञात आरोपींनी मोटार सायकलवर येऊन त्यांच्या जवळील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्ती हिसकावून नेली.

सदर घटनेनंतर सुनिल पुंडलीक उमाप, साईनाथनगर, नेवासा, ता. नेवासा, यांनी नेवासा पोलीस स्टेशन गुरनं ०५/२०२५ वीएनएस कलम ३०९ (४) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी

त्यानंतर, दि. १३/०१/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमालाची माहिती घेत, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास लावला आणि इसम नामे अक्षय गांगुर्डे, रा. श्रीरामपूर यास निष्पन्न केले, पथकाने आरोपीचा राहते घरी शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) अक्षय दादासाहेब गांगुर्डे, वय २८, रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा २) सुभाष उर्फ भावडया दिलीप शिंदे, रा. बहीरवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर व इतर एक अनोळखी (फरार) यांचेसह केल्याची माहिती सांगीतली.

आरोपी

पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे गुन्हयात चोरीस गेलेल्या मोबाईलबावत विचारपूस केली असता, आरोपीने गुन्हयांतील मुद्देमाल त्याचे राहते घरातून काढून दिल्याने तो पंचासमक्ष हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्म, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आरोपी
आरोपी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!