नेवासा | अविनाश जाधव – सिजेंटा फाउंडेशन इंडिया व ईडीएफ (EDF) यांच्या संयुक्त विद्यमाने गोगलगाव येथे प्रगतशील शेतकरी श्री. सुनील मते यांच्या शेतावर ऊस पिकाच्या पाचाट व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक नुकतेच यशस्वीरित्या पार पडले. या प्रसंगी सिजेंटा फाउंडेशनचे अहिल्यानगर चे प्रोजेक्ट लीड श्री. पवन थोरात, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री. तवले साहेब, तालुका प्रतिनिधी श्री. नामदेव गव्हाणे व महेश नागोडे, प्रसाद साळुंके हे मान्यवर उपस्थित होते. सिजेंटा फाउंडेशन व ईडीएफच्या उपक्रमांमागील मार्गदर्शक असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ व हवामान पूरक शेती प्रकल्प प्रमुख डॉ.श्री.गजानन राजुरकर व श्री.समीर मिर्झा यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यांच्या शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान व धोरणांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे महत्त्व पटले आहे.

श्री. पवन थोरात यांनी ऊस पिकातील पाचाट व्यवस्थापनाचे शास्त्रीय फायदे सविस्तर सांगितले. तसेच सिजेंटा फाउंडेशन व ईडीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. त्यांनी पाचाट व्यवस्थापनामुळे उत्पादन वाढ कशी होते, जमिनीची सुपीकता कशी टिकून राहते, याबद्दल मार्गदर्शन केले. श्री. नवले साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने ऊस पिकांमधील पाचट न जाळणे व त्याऐवजी जैविक पुनर्वापर करण्याबाबत सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना पाचट व्यवस्थापनासाठी शासकीय मदतीच्या योजना समजावून सांगितल्या.

या कार्यक्रमाने शेतकऱ्यांमध्ये ऊस पिकाची शास्त्रशुद्ध काळजी घेण्याची जागरूकता निर्माण केली असून, उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यक्रमाला गोगलगाव व आजूबाजूच्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांमध्ये ऊस लागवडीबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली असून, त्यांना प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून नवी कौशल्ये आत्मसात करता आली. सिजेंटा फाउंडेशन व ईडीएफच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत असून, भविष्यात ऊस उत्पादनात गुणात्मक वाढ होण्याची अपेक्षा आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.