सोनई – मुळा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादीत झालेल्या २७१२७१ व्या साखर पोत्याचा पुजन समारंभ काल सोमवार दि.१३ जानेवारी रोजी कारखान्याचे संस्थापक व जेष्ठ नेते यशवंतरावजी गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री शंकरराव पाटील गडाख, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले व सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव पांढरे व बाळासाहेब परदेशी यांच्या शुभहस्ते साखर पोत्यांची विधीवत पुजा झाली. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी उपस्थीतांचे स्वागत केले.

याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेव तुवर यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, कारखान्याचे आजपर्यंत एकुण ३ लाख ३५ हजार मे.टन गळीत झाले असून ३० लाख लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे. तसेच या हंगामात विजेची सव्वादोन कोटी युनिटची निर्मिती झाली आहे. कारखान्याचे दैनंदिन गाळप आठ ते साडेआठ हजार टनापर्यंत होत असून स्टॉपेजेसचे प्रमाण विशेष नसल्याने त्याबद्दल बोलताना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले. तसेच यंदा साखरेचा चालू उतारा ११.३४ व सरासरी उतारा १०.६१ टक्के असून यापुढेही उतारा चांगला राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हंगामात गळीतासाठी आलेल्या ऊसाच्या पेमेंटबाबत बोलताना अध्यक्ष तुवर यांनी सांगितले की १ ते १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा झालेल्या पहिल्या पंधरवाड्यातील ऊस पेमेंट लवकरच करण्यात येईल. तसेच आपले शुगर युनिट, इथेनॉल निर्मिती प्रकल्प व वीज प्रकल्प अतिशय चांगल्या कार्यक्षमतेने सुरु असून चालू हंगामात जास्तीत जास्त गाळप होणे आवश्यक आहे. म्हणून ऊसाची अन्य विल्हेवाट न करता सर्व सभासद व ऊस उत्पादकांनी त्यांनी पिकवलेला सर्व ऊस मुळा कारखान्याला गळीतासाठी द्यावा असे अवाहन केले. तसेच जेष्ठ नेते मा. यशवंतरावजी गडाख यांचे वतीने तसेच माजी मंत्री शंकरराव पाटील गडाख यांच्या वतीने त्यांनी सर्वांना मकर संक्रान्तीच्या सुभेच्छा दिल्या. योगेश घावटे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.