सोनई – यश अकॅडमीच्या विद्यार्थिनी जान्हवी खंडागळे हिची पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील डॉ. होमी भाभा विज्ञान परीक्षेसाठी निवड झाली आहे. डॉ. होमी भाभा विज्ञान परीक्षा ही विज्ञान विषयात रुची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रतिष्ठित परीक्षा आहे. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण अशा या स्पर्धेत जान्हवीने आपले कौशल्य दाखवत राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले आहे.

मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा . उदयन गडाख , सचिव उत्तमरावजी लोंढे सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांनी कौतुक केले.जान्हवीला प्राचार्य अझर गोलंदाज , पर्यवेक्षक असिफ बाबुलाल व विज्ञान शिक्षक भाऊसाहेब दराडे व इतर शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले . जान्हवीच्या या यशासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.