ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
यशोरंग

नेवासा येथे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात आयोजन, प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या “यशोरंग कलाविष्कार सोहळा 2025” चा शुभारंभ क्रीडा स्पर्धांच्या उदघाट्नने मोठ्या उत्साह व जल्लोषात आणि विद्यार्थी -विद्यार्थिंच्या उस्फुर्त सहभाने झाला.
मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख व उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतुन श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय सुरु झालेल्या यशोरंग कलाविष्कार 2025 सोहळ्याचा शुभारंभ शुक्रवार दि. 4 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्या हस्ते उपप्राचार्य डॉ. अरुण घनवट उपप्राचार्य राधा मोटे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पुराणे, क्रीडा विभागाचे डॉ. रवींद्र खंदारे, प्रा. सुनील गर्जे, कार्यालयीन अध्यधीक्षक बाबासाहेब माळी, सोहळ्याचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. बाळासाहेब जगताप, समन्वयक प्रा. अमोल जाधव, प्रा. देविदास साळुंके यांच्या उपस्थितीत महाविद्यालय अंतर्गत क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभाने झाला.

यशोरंग

“यशोरंग कलाविष्कार सोहळ्यात दि. 3 ते 11 जानेवारी अशा क्रिडा स्पर्धा, रांगोळी, चित्रकला, केशभूषा आनंदमेळा, फनी गेम्स, पारंपारिक वेशभूषा, विविध गुणदर्शन (सांस्कृतिक कार्यक्रम) अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ११ जानेवारी रोजी सकाळी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा होणार असल्याची माहिती सोहळ्याचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. बाळासाहेब जगताप यांनी दिली.

“यशोरंग कलाविष्कार सोहळा म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ ठरत आहे. जास्तीतजास्त विद्यार्थी विद्यार्थिनीसह प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी या सर्वांच्याच प्रत्यक्ष सहभागाने सोहळ्याची भव्यता वाढली आहे. “यशोरंग” सोहळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारा दीपस्तंभ ठरला आहे आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी केले.
– ‘यशोरंग’ विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ : प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे

यशोरंग
यशोरंग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

यशोरंग
यशोरंग
यशोरंग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

यशोरंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!