ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
रस्ता

नेवासा – तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष शरद भाऊ पवळे व राज्य समन्वयक श्री दादासाहेब जंगले पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नुकतेच दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी नेवासा तालुका गट विकास अधिकारी श्री संजय लखवाल यांना कार्यालयात जाऊन तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेत रस्ता व शिवरस्ता समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थरीय समिती स्थापन करावे यासाठी तहसीलदार संजय बिरादार यांनी परिपत्रक हे काढले आहे त्या परिपत्रकानुसार येत्या 26 जानेवारी 2025 पर्यंत ग्रामस्थरीय स्थापन करून त्यासंबंधीचा अहवाल आम्हास द्यावा अशी मागणी करण्यात आली.

रस्ता

त्यावेळी संजय लखवाल- गटविकास अधिकारी यांचे कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी श्री दीपक भगवान कंगे यांनी चळवळीच्या कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारले व गटविकास अधिकारी अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे त्यांना सुपूर्त करतो असे सांगितले, गेल्या तीन महिन्यापासून तहसीलदारांनी परिपत्रके काढून गटविकास अधिकारी यांनी परिपत्रका नुसार ग्रामस्तरीय समिती काही गावात स्थापन केल्या परंतु सर्वच गावांमध्ये ग्रामस्तरीय स्थापनेबाबत प्रक्रिया राबवावी व शेत व शिवरस्ता समस्या सोडवण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी असे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी केले.

रस्ता

यावेळी तालुक्यातील शिव – पाणंद रस्ता चळवळीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे , सागर सोनटक्के , कृष्णा घोडेचोर, त्र्यंबक भदगले श्रीपत दारुंटे, सुनील पाठक,शिवाजी काळे,राजू गरड, मुरलीधर जरे, रमेश भक्त,, कुशिनाथ फुलसौंदर , अविनाश मेहर बाबा,बाळू थोरात , मिनीनाथ घाडगे, सुजित तुवर,विठ्ठल करमड , मिनिनाथ घाडगे , काशिराम धाडगे , हाफिज खान पठाण, सुजित तुवर सगाजी आयनर, बबन शिंदे, संतोष शिंदे,सोमनाथ शिंदे ,संभाजी पवार .गणेश बोचरे, सोमाभाऊ माकोणे व रामदास पवार व त्यांचे गावकरी आदिंसह उपस्थित होते.

newasa news online
रस्ता

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रस्ता
रस्ता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रस्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!