सोनई | संदिप दरंदले – कांगोणी येथील प्रीतम नामदेव वीरकर यांना बारामती कृषी महाविद्यालय येथे कृषी पदवीधर वर्गात सुवर्ण पदक मिळाले.त्यांना राज्याचे कृषी मंत्री नाम. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला.यानिमित्ताने बारामती ऍग्रीकल्चर ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाच्या वतीने कृषी प्रदर्शन व गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा बारामती येथे आयोजित केला होता.यावेळी बारामती ऍग्रीकल्चर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, खा.सुप्रियाताई सुळे,

खा.सुनेत्राताई पवार, कृषीतज्ञ् राजेंद्रदादा पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी प्रीतम नामदेव वीरकर यांना कृषी अभ्यासक्रमात सुवर्णपदक व वीस हजार रुपये बक्षीस,प्रमाणपत्र कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते देण्यात आले.कांगोणी येथील प्रीतम वीरकर या सोनई आरोग्य केंद्राचे आरोग्य पर्वेक्षक डॉ. नामदेव वीरकर व सौ. संगीता वीरकर यांच्या कन्या आहेत.प्रीतम वीरकर या शालेय आणि महाविद्यालयात अतिशय हुशार होत्या. त्यांना वडील नामदेव वीरकर आणि आई संगीता वीरकर यांचे लहानपणापासून मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल सोनई, कांगोणी, शनिशिंगणापूर परिसरात आनंद व्यक्त होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.