नेवासा – नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथ देवस्थानला श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत राष्ट्रीय संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी पौष रविवार यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी भेट दिली.श्री कालभैरवनाथ हे जागृत असे दैवत असून भक्तांना ऊर्जा देणारे तिर्थस्थान आहे यामुळे भगवंताबद्दल असलेली श्रध्दा शेवटच्या श्वासापर्यंत टिकवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी श्री कालभैरवनाथ मंदिर परिसरात झालेल्या विकास कामांची पहाणी गुरुवर्य बाबाजींनी केली सर्व भक्तांनी पाठबळ दिल्याने येथील मंदिराचा जीर्णोद्धार होऊन परिसर विकास झाला आहे,भविष्यात ही तो होत राहील,श्री कालभैरवनाथ हे जागृत असे दैवत असून सर्व भक्तांचे सेवा व पाठबळ या स्थानाच्या उत्कर्षासाठी दिले म्हणूनच आपल्या श्रद्धेचे फळ म्हणून या क्षेत्राची उन्नतीकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे सांगून त्यांनी या देवतेबद्दल असलेली श्रध्दा शेवटच्या श्वासापर्यंत टिकवा असे आवाहन केले.

यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांचे संतपूजन श्री कालभैरवनाथ मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळींच्या वतीने करण्यात आले.यावेळी झालेल्या भेटी प्रसंगी देवगडचे संतसेवक रामनाथ महाराज पवार यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी देवस्थान विकास कामांची माहिती दिली. यावेळी श्री कालभैरवनाथ देवस्थानची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांचा गुरुवर्य श्री बाबाजींच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संतसेवक रामनाथ महाराज पवार, बाळकृष्ण महाराज कानडे,लक्ष्मण महाराज नांगरे,विजय महाराज पवार,गणेश महाराज तनपूरे,आसाराम नळघे सर,माजी सरपंच नंदूभाऊ वाखुरे,भाऊसाहेब येवले,डॉ. संतोष शेळके,देवस्थानचे विश्वस्त बी.जी.मिटकरे, बाबासाहेब वाखुरे,सीताराम घोरपडे, दिनकरराव हारदे, दुर्योधन महाराज भोंगळ,दिलीपभाऊ नळघे,प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण,पिंटूभाऊ बोरकर,सेवेकरी राजेंद्र नळघे,ज्ञानेश्वर पटारे,राजेंद्र पटारे,तरुण मंडळाचे सेवेकरी कार्यकर्ते यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.