नेवासा फाटा – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यात महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे धोरण घेतलेले असून पश्चिम वाहिनी नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका हाती घेतलेली आहे. त्यामुळे लवकरच हा आराखडा सरकारच्या विचारधीन असून या कामासाठी नियोजन आणि जलविज्ञान विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या माध्यमातून हे काम करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी ना. विखे यांच्याकडे एक चिड्डी देवून पश्चिम वाहिनीच्या पाण्याबाबत विचारणा केली असता या प्रश्नावर उत्तर देतांना ना. विखे यांनी ही माहीती दिली. यावेळी पुढे बोलतांना विखे म्हणाले की, या पश्चिम वाहीनीचे पाणी वळविण्याचे स्वप्न स्व. लोकनेते माजी केंद्रिय मंत्री बाळासाहेब विखे यांचे होते. ते आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख भूमिकेतून साकार होण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. त्यादृष्टीने सरकार वाटचाल करत असल्याची माहीती यावेळी त्यांनी दिली.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, पंचगंगा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख, श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज, मंहत सुनिलगिरी महाराज, त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगे, अध्यक्षा अॅड. सुमर्ती घाडगे यांच्यासह अनेक साधूसंत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ना. विखे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर मंदिरासाठी ७०० कोटी रुपयांचा विकास आराखडा आखलेला असून लवकरच देवस्थान विकासाबरोबरच तालुक्यातील जनतेचाही यामध्ये मोठा अर्थिक विकास होणार आहे. तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे सांगतील ते कामे आता आपण मार्गी लावणार असून आता तुम्ही सुद्धा परत मागेपुढे पाहू नका? अशी कोपरखिळी उपस्थितांना मारत आपल्या दिमाखदार भाषणात ना. विखे यांनी अनेकांना धक्क्यावर धक्के देत विकास कामांचा आराखडा आणि नियोजनाबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून नेवासा पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब पटारे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त त्यांनी पटारे यांना शुभेच्छा देत संवाद साधला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.