नेवासा – मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून नेवासा शहरातील दुर्गादेवी महिला मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि. १७) जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिला सुवासिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्री शक्तीचे दर्शन घडले. औदुंबर चौकात असलेल्या हॉटेलच्या सभागृहात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विठ्ठल रुख्मिणी मातेच्या प्रतिमेचे औक्षण व पूजन करण्यात येऊन हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दुर्गादेवी महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी सुवासिनींचे तिळगुळसह वाण भेट देऊन स्वागत केले. महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाला रंगत आणली. याप्रसंगी हॉटेल प्रणामच्या संचालिका शालिनी गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्य कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. हॉटेलचे संचालक रंजनदादा जाधव, बंटी जाधव, माधुरी जाधव यांचे सदस्यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.