ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बँक

बँकेच्या अकराव्या वर्धापनदिनी उपस्थित ग्राहकांची स्तुतीस्तुमने!

नेवासा फाटा – नेवासा फाटा येथील छत्रपती राजर्षी शाहू को-ऑपरेटिव बँकेच्या अकराव्या वर्धापनदिनी बँकेचे अध्यक्ष अजय पाटील आणि ग्राहकांचे उपस्थितीत भव्यदिव्य सोहळा पार पाडण्यात आला. प्रथम छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री पवार यांनी प्रास्ताविक मांडताना बँकेचा आतापर्यंतचा लेखाजोखा सादर केला. तसेच मान्यवरांनी मांडलेल्या आपल्या सूचनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदलीची अट शीथील करावी, तक्रार निवारण बॉक्स ठेवावा याबरोबरच चेक क्लिअरिंगची सुविधा अतिशय उल्लेखनी असून बँकेची वसुली पद्धत अतिशय गोड बोलून ग्राहकाला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता वसुली केली जाते,

बँक

बँकेतील स्टाफ वेळोवेळी ग्राहकांना मदत करतो, बँकेचे मॅनेजर चव्हाण सरांसारखा व्यक्ती असल्याने आर्थिक सुलभता आणि कार्यातून ही बँक मोठी झाली आहे असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. बँकेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी यावेळी बँकेला तीन पुरस्कार मिळाले असून योग्य तारण व कारण पाहूनच कर्ज वितरण केले जाते असे सांगितले तसेच या पुढील काळात सभासदांचे लाभासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे ,अभय बलई, बाळासाहेब आंबीलवादे,उंदरे पाटील, एडवोकेट नितीन अडसुरे, रितेश कराळे, अण्णाभाऊ पेचे, शंतनू सूर्यकर ,नारायण आठरे,आदी वक्त्यांनी आपले मनोगत मांडले. आणि यापुढील काळासाठी बँकेच्या कर्मचारी आणि अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

बँक
बँक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बँक
बँक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बँक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!