भालगावच्या शितल झरेकर-आठरे यांच्या मणी तारा चौकट पाटी क्युरिअम उपकरणास तालुक्यात प्रथम क्रमांक
राज्यातील विद्यार्थ्यांना क्यु आर कोड द्वारे गणिताचे आनंदी अध्यापन.. नेवासा गणित विज्ञान प्रदर्शनात भालगावच्या शितल झरेकर यांच्या मणी तारा चौकट पाटी क्युरिअम उपकरणास प्रथम क्रमांक
नेवासा – नेवासे तालुक्यातील जिल्हा परिषद भालगाव शाळेतील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका शितल झरेकर-आठरे यांचा ५२ व्या विज्ञान-गणित प्रदर्शनात शिक्षक गटात नेवासा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला.त्यांनी तयार केलेल्या मणी तयार चौकट पाटीद्वारे राज्यभरातील लाखो विद्यार्थी क्यु आर कोड स्कॅन करून तंत्रज्ञानाचा वापर करत आनंददायी गणित शिकणार आहेत. शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा व विज्ञान-गणित संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय प्रदर्शन राजे संभाजी माध्यमिक विद्यालय कौठा येथे नुकतेच संपन्न झाले.

अध्ययन अध्यापन प्रक्रिया सोपी व्हावी व तंत्रज्ञानाचा वापर करत यासाठी शिक्षक निर्मिती साहित्य प्राथमिक शिक्षक पहिली ते आठवी या गटातून प्रदर्शनामध्ये शिक्षिका शितल झरेकर यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये शिक्षिका शितल झरेकर यांच्या मनी तारा चौकट – क्यूरियम या गणितावर आधारित शैक्षणिक साहित्यास तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. विरगाव येथील होणाऱ्या जिल्हास्तरीय प्रदर्शनास या उपकरणाची निवड झाली आहे.
या यशाबद्दल गटविकास अधिकारी संजय लखवाल, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड,केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद, सरपंच दादासाहेब खरात,उपसरपंच बाळासाहेब आहेर,पोलीस पाटील बाळकृष्ण भागवत,चेअरमन युवराज तनपुरे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश तनपुरे, उपाध्यक्ष स्वाती खरात, मुख्याध्यापिका सरिता सावंत,गणित विज्ञान संघटनेचे अध्यक्ष तुकाराम फटांगरे,संजय काळे,प्राचार्य सचिन कर्डिले यांच्या सह शिक्षक,ग्रामस्थ,पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

“मणी तारा चौकट पाटी” हे साहित्य विद्यार्थ्यांना आनंददायी हसत खेळत गणित शिकण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षिका शितल झरेकर यांनी बनवलेल्या साहित्याच्या क्यू आर कोड द्वारे राज्यातील लाखो शिक्षक,विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल
– शिवाजी कराड, गटशिक्षणाधिकारी नेवासा
“मणी तारा चौकट पाटी” हे साहित्य विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरील गणिताच्या पायाभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी व त्यांना हसत खेळत गणित शिकण्यास खूप उपयुक्त आहे. तसेच सदर साहित्य हे अल्प खर्चिक व बहुउपयोगी सर्व गणिती क्रियांसाठी उपयुक्त आहे.मणी तारा चौकट या साहित्याच्या वापरामुळे गणित विषयाची भिती न बाळगता विद्यार्थी मजेत गणित शिकत आहेत.विद्यार्थी क्युरिअम च्या साह्याने कधीही,कोठेही शिकू शकतो.
– शितल झरेकर ,शिक्षिका


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.