नेवासा – नेवासा तालुक्यातील देडगाव येथे रात्री घराबाहेर पडवीत झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कांताबाई विष्णू मुंगसे (वय ४८) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, १९ जानेवारी रोजी त्यांचे पती व त्या घराच्या पडवीत झोपलेल्या होत्या.

मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान एक इसम जाताना दिसला. त्याला पाहून कोण आहे? असे विचारले असता त्याने गळ्यातील मंगळसूत्र काढून घेऊन तो पळून गेला. त्यावेळी आणखी दोन इसम घराच्या बाजूला उभे होते. त्यावेळी मुलगा व पती जागे झाले. पडवीत अडकवलेल्या पॅन्टच्या खिशातील दोन हजार रुपयेही चोरट्यांनी चोरुन नेल्याचे दिसून आले. या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.