नेवासा – नेवासा तालुक्यात आणि परिसरात काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चोऱ्या आणि गुन्हेगारीचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील रामडोह येथे घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अण्णासाहेब नारायण बोरुडे (वय ५८) रा. रामडोह, ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की १९ जानेवारी रोजी त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची टीव्हीएस स्टारसिटी मोटारसायकल (एमएच १७ सीएफ ८२२१) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.