नेवासा – महात्मा फुले कृषि वि्यापीठ राहुरी संलग्न कृषि महाविद्यालय सोनईच्या कृषीदूतांच्यावतीने ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील नाजिक चिंचोली येथे शेतकरी ह.भ.प. महादेव धाडगे यांच्या शेतावर टरबुज डाळिंब,कांदा या पिकांसाठी आयोजित केलेल्या कृषि चर्चासत्रात कृषीदृतांनी शेतकऱ्याना मार्गदर्शन केले.रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रण या विषयावर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील बोरुडे यांनी सर्वांचे स्वागत करून कृषि महाविद्यालय शिक्षणाबरोबर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत असल्याचे संगितले. कृषीमहाविद्यालयात मातीपरीक्षण व जिवाणू खतांचे उत्पादन सुरू केले असून त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आव्हान त्यांनी केल.

प्रा.राहुल गडाख यांनी रबी पिकांचे व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. श्रीकृष्ण हुरुळे आणि नरेंद्र दहातोंडेयांनी पिकावरील एकात्मिक पद्धतीने कीड व रोग नियंतण याविषयी माहिती दिली. कृषी शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकरी विजय देशमुख यांनी जमिनीचे आरोग्य व शेतावरील पाण्याचे व्यवस्थापन आणि नियोजन तसेच सेंद्रिय व रासायनिक खताबरोबर जिवाणू खतांचा वापर आणि बीज प्रक्रियेचे महत्व शेतकऱ्यांना सांगितले.प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य डॉ. सुनील बोरडे, कार्यक्रम
समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. जयसिंग वाधमारे , प्रा.राहुल गोंधळी व इतर विशेष तज्ञ यांचे मार्दर्शन लाभले.

या चर्चासत्राला कृषि सहायक अर्जुन धाडगे, सरपंच भाकचंद चावरे , प्रगतशील शेतकरी नवनाथ चौघुले, योगेश पाठक,मयूर चावरे, नारायण घाडगे, कृष्णा गायकवाड, गणेश धाडगे, ईतर प्रगतशील शेतकरी वैभव धाडगे , पोपट धाडगे ,अर्जुन धाडगे,प्रसाद धाडगे,प्रवीण धाडगे,नामदेव धाडगे,विठ्ठल धाडगे,वैभव धाडगे,वैभव चौघुले,सागर चौघुले,नवनाथ चौघुले,नंदकुमार धाडगे,महादेव धाडगे,संकेत धाडगे इतर शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी कृषिदुत तुषार साबळे, आदेश दळवी ,आदिनाथ मिसाळ, विश्वास झंजाड, सिद्धीराज सपकळ, यांनी परिश्रम घेतले. शेतकरी अर्जुन धाडगे यांनी आभार प्रदर्शन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.