ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
दागिने

नेवासा – एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या व बसमध्ये चढताना मुद्दाम धक्काबुक्की करून महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला चोरांना नेवासा पोलिसांनी जेरबंद केले आहे. एसटी बसणे प्रवास करणाऱ्या महिलांच्या पिशवीतील सोन्याचे दागिने हात घालून चोरणाऱ्या महिला चोरांचा सर्वत्र सुळसुळाट आहे. बुधवार दि. 8 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मीरा मच्छिंद्र डेंगळे वय 65 वर्ष रा. लोणी ता. राहता या लोणी प्रवराला जाण्यासाठी भगवानगड ते नाशिक या बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील 42 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी व डोरले कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरले. या बाबत पोलीस ठाणे नेवासा येथे मीरा डेंगळे यांनी फिर्याद दाखल केली होती, या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला होता.

दागिने

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. अजय साठे, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, किरण पवार यांनी हाती घेतला होता. या अनोळखी संशयित महिला चोरांबाबत बाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपासा दरम्यान तातडीने नेवासा बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता नागरिकांनी माहिती दिल्याप्रमाणे संशयित महिला दिसून आल्या होत्या. संशयित महिलांची ओळख पटवण्यासाठी नेवासा पोलिसांनी मागील सात दिवस नेवासा ते श्रीरामपूर बस स्थानकापर्यंत पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली तसेच त्या रहात असलेल्या ठिकाणापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून नावे निष्पन्न केली.

दागिने

नेवासा पोलीस सदर संशयित महिलांच्या घरा पर्यंत पोहोचताच व पोलिसांना पाहताच कावऱ्याबावऱ्या झाल्या त्यांना नेवासा बस स्थानकातील चोरी बाबत विचारपूस केली असता सुरुवातीला नकार दिला परंतु पॉलिसी खाक्या दाखवण्याची भिती घालताच नेवासा बस स्थानक येथे सोन्याचे दागिने चोरी केले बाबत कबुली दिली. तसेच फिर्यादी महिलेचे चोरलेले सोन्याचे दागिने काढून दिले. सदर 1.कांताबाई कमल लोंढे व 2.सरस्वती दत्तू खंडारे दोन्ही रा. अशोक नगर, श्रीरामपूर या महिलांना ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही केली आहे. यापूर्वी देखील नेवासा बस स्थानक येथून चोरीच्या घटना घडलेल्या आहेत या घटनेमध्ये या अटक महीला आरोपी महिलांचा काही संबंध वगैरे आहे का याचा देखील तपास केला जाणार आहे.

newasa news online
दागिने

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दागिने
दागिने

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दागिने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!