नेवासा – नेवासा शहरातील वास्तुविशारद, व्यावसायिक, शिक्षक, शासकीय नोकरदार, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आदींचा शहरात अमरनाथ गृप असून रोज पहाटे फिरावयास जाणे योगा, व्यायाम करणे असा दिनक्रम याचबरोबर सामाजिक उपक्रमातुन वृक्षा रोपन, गो शाळेस गायींच्या निवार्या साठी शेड, वृद्धाश्रमास मदत आदी उपक्रम स्व.ॲड. गोरक्षनाथ काकडे यांच्या मार्गदर्शनात सुरु होते. मात्र मागीलवर्षी ३ जानेवारी २०२४ रोजी हार्ट अॅटॅक ने स्व. गोरक्षनाथ काकडे यांचे निधन झाले होते . त्यांच्या निधनाने अमरनाथ गृप उणीव निर्माण झाली होती.

आजही त्यांच्या पश्चात अमरनाथ गृपचे कार्य सुरु असुन त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून अमरनाथ गृप ने श्री .संत ज्ञानेश्वर मंदिर गोशाळेस हिरवा चारा देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला .व आदरांजली वाहिली. यावेळी योगेश रासने ॲड. काकडे गृपमधील सर्वांमध्ये मिसळून सदस्यांच्या दु: ख हलके करणारे,अडणीत दुर करणारे, हसुन खेळुन राहणारे व्यक्तीमत्व होते .त्यांच्या जाण्याची गृपला उणीव भासत आहे. अशाच सामाजिक उपक्रमातुन आपण त्यांचे कार्य पुढे नेऊया हिच त्यांना आदरांजली, असे प्रतिपादन केले. यावेळी नंदकुमार पाटील,रवींद्र जोशी, योगेश रासने, शशिकांत नळकांडे, शंकर ओहळ, राजेंद्र महाजन, दिलीप जगदाळे, रामनाथ जाधव, जालु गवळी, अरुण धनक, बजरंग ईरले, अंबादास ईरले, छोटु उगले आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.