नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात शिवी दिल्यास ५०० रुपये दंड करण्यात आलेला आहे या निर्णया प्रमाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी ठराव घ्यावेत अशी सुचना जिल्हाधिकारी यांनी देण्याची मागणी सरपंच शरदराव आरगडे व सदस्य गणेश आरगडे यांनी केली आहे
सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते नोव्हेंबर मध्ये झालेल्या ग्रामसभेने आई व बहीणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आलेली आहे तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर ५०० रुपये दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत कडून करण्यात येणार आहे येते

सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी शिव्या द्यायच्या नाहीत जर शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकरण्यात येतो
शिव्या देताने आईचा व बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अंगा संदर्भात शिवीगाळ करून अर्वाच शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई बहिणींना व मुलीला आठवले पाहिजे कारण शिव्या देणारा व्यक्ती ज्या स्त्रीच्या अंगाचा शिव्या देताना उच्चार करतो तसेच शरीर आपल्या कुटुंबातील महिलेचे असते
शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे तसेच होणारे वाद होत नाहीत त्यामुळे पोलीस स्टेशन कोर्टात निर्थक खर्च आणि मानसिक त्रास होत नाही यासाठी सौंदाळा गावासारखा पॅटर्न जिल्ह्यात राबवावा व ग्रामपंचायतने तयार केलेली प्रतिज्ञा सर्व शाळा महाविद्यालय शासकीय कर्मचारी यांना द्यावी यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ यांना निवेदन देण्यात आले असल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.