नेवासा – हंडी निमगाव येथील नेवासा फाटा हंडी निमगाव रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ विहिरीत तरंगत असलेला मृतदेह आढळला पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका विहिरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांना हा मृतदेह दिसला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी तातडीने पोलिस व स्थानिक प्रशासन पोहोचले.

सदर घटनेबाबत स्थानिक पोलीस पाटील धानापुणे यांनी नेवासा पोलीस स्टेशनला माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू आहे, त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कृत्याचा समावेश आहे का याची चौकशी केली जात आहे. घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.